जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. देहूरोड जवळ इंडिका कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. देहूरोडच्या पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीवरील आकाश रामोशी या तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर मंगेश वैद्य आणि नरेश जगपाती हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आकाश रामोशी, मंगेश वैद्य आणि नरेश जगपाती हे तीन मित्र दुचाकीवरुन निगडीहून देहूरोडला जात होते. यावेळी देहूरोड पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या इंडिका गाडीने धडक दिली. देहूरोड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.