पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार असून त्यापकी एक सभा कोल्हापुरात होणार आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी येथे झालेल्या लोकसंवाद कार्यक्रमप्रसंगी दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्वाळ्यामुळे आमदार सुरेश हाळवणकर यांना विधानसभेची निवडणूक लढविता येणार असून त्यांच्या उमेदवारी मार्गात कसलाही अडसर उभा राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपाच्या वतीने लोकसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत नागरिक, कार्यकत्रे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांकडून केले जाते. इचलकरंजी येथील लायन्स क्लबच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी नागरिकांनी विविध क्षेत्रातील समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये नागरी समस्या, यंत्रमागधारकांसह कामगारांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, खंडपीठ, वाहतूक, शिक्षण आदी विविध प्रश्नांचा समावेश होता.
    आमदार पाटील म्हणाले, या कार्यक्रमात लोकांनी अनेक थरातील मोठय़ा प्रमाणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याचा साधा अर्थ म्हणजे गेली पंधरा वष्रे सत्तेत असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे शासन निष्क्रिय होते. त्यामुळे भाजपाला सत्तेत आल्यानंतर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न गांभीर्यपूर्वक सोडवावे लागणार असून त्यासाठी पक्ष वचनबध्द आहे.आमदार हाळवणकर यांनी आपण केलेल्या विविध कामांची माहिती देऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन केले. स्वागत भाजपा शहराध्यक्ष विलास रानडे यांनी केले.