अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध चित्रकार रमेश लक्ष्मण जुईकर यांनी साकारलेल्या विलोभनीय चित्रांचे प्रदर्शन येत्या २ ऑगस्ट रोजी मुंबईत नेहरू सेंटरच्या कलादालनात भरविण्यात येणार आहे. जवळपास ५० चित्रांचा या प्रदर्शनात समावेश असल्याची माहिती रमेश जुईकर यांनी दिली.

रमेश जुईकर हे अलिबाग तालुक्यातील शहाबाज (चौकीचा पाडा) गावचे मूळ रहिवासी आहेत. लहानपणापासूनच त्यांना चित्रं काढण्याची आवड होती. पुढे ही आवड जोपासताना कला महाविद्यालय, बांद्रा येथून त्यांनी चित्रकलेचे रीतसर शिक्षण घेतले. तालुक्यातील जनता शिक्षण मंडळाच्या सारळ माध्यमिक शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी केली. फळ्यावर विद्यार्थ्यांना निसर्गचित्र, वस्तुचित्रांचे धडे देताना आपल्या अंगभूत कलेलाही अधिक वृिद्धगत केले.

kolhapur, crematorium
कोल्हापूरकरांचे असेही दातृत्व; स्मशानभुमी दानपेटीत २ लाखांवर देणगी जमा
jarag nagar municipal corporation school
कोल्हापुरातील जरग नगरातील शाळेसाठी पालकांची सायंकाळपासूनच रीघ; महापालिकेच्या शाळा प्रवेशाचे अनोखे चित्र!
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा
fire broke out in huts of sugarcane workers
शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग; प्रापंचिक साहित्य बेचिराख

चित्रकाराच्या बोटांमध्ये जादू असते. त्यांची कलादृष्टी इतरांपेक्षा वेगळी असते. रंगांच्या दुनियेत वावरताना आपल्या परिसरातील निसर्ग डोळ्यांत साठवून ठेवण्याबरोबरच तो कॅमेऱ्यात कैद केला तर अधिक काळ सोबत राहील, हे रमेश जुईकर यांनी जाणले आणि त्या दृष्टिकोनातून कॅनव्हासवर ब्रश घेऊन चित्र साकारणारे हात कॅमेऱ्याच्या लेन्सवरही सहज फिरू लागले. एका क्लिकमधून चित्रकाराबरोबरच छायाचित्रकार म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली.

निवृत्तीनंतरही त्यांनी आपल्यातला चित्रकलाकार जिवंत ठेवला. त्यांनी काढलेली विविध माध्यमांतील चित्रे पाहण्यासारखी आहेत. ग्रामीण जीवनातील खडतर कष्ट करून जगणारी माणसे, तसेच विलोभनीय निसर्गचित्रे मनावर परिणाम करून जातात.

अशा विलोभनीय चित्रांचे प्रदर्शन २ ऑगस्ट ते ८ ऑगस्टपर्यंत नेहरू सेंटर कला दालनात भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन आपल्या कलेसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे रमेश जुईकर यांनी सांगितले.