हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना पंपावर पेट्रोल न देण्याचा आदेश शासनाने मागे न घेतल्यास येत्या १ऑगस्टपासून पेट्रोल खरेदी बंद करण्याचा इशारा पंपचालकांच्या राज्यस्तरीय संघटनेने दिला आहे.

राज्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे अनिवार्य व्हावे म्हणून राज्य परिवहन खात्याने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पंपावर पेट्रोलच न देण्याचा आदेश काढला असून त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या पंपचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे या संदर्भात जारी केलेल्या शासन आदेशामध्ये नमूद केले आहे. या आदेशाला राज्याच्या विविध भागातील पंपचालकांनी यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. या संदर्भात गेले दोन दिवस झालेल्या चर्चेनंतर शासनाने हा आदेश मागे न घेतल्यास येत्या १ ऑगस्टपासून राज्यभरातील पंपचालकांनी पेट्रोल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

पंपचालकांच्या फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन या राज्य पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी या संदर्भात सांगितले की, हेल्मेटसक्तीचा कायदा गेली अनेक वष्रे अस्तित्वात आहे. पण कोणतेही सरकार त्याची परिणामकारक अंमलबजावणी करू शकलेले नाही.

आता त्यासाठी पेट्रोल पंपचालकांना वेठीला धरले जात आहे. हेल्मेट न घालता पंपावर आलेल्या ग्राहकाला पेट्रोल न दिल्यास वाद, भांडणे आणि मारामारीचेही प्रसंग निर्माण होऊ शकतात, तर दुसरीकडे अशा व्यक्तीला पेट्रोल दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा शासनातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे पंपचालक कात्रीत सापडले आहेत. म्हणून शासनाने या अंमलबजावणी कार्यक्रमातून पंपचालकांना न वगळल्यास येत्या १ ऑगस्टपासून राज्यभर पंपचालकांकडून पेट्रोल खरेदी बंद केली जाईल.  राज्यात एकूण सुमारे साडेचार हजार पेट्रोल पंप असून ते बंद राहिल्यास सर्व संबंधित घटकांचे नुकसान होणार आहे. म्हणून हा आदेश मागे घेण्याचे आवाहन संघटनेतर्फे लोध यांनी केले आहे.