30 March 2017

News Flash

सल्या चेप्यावरील गोळीबारप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्यावर न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर पोलिसांनी

वार्ताहर, कराड | Updated: September 12, 2013 12:17 PM

कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्यावर न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर पोलिसांनी चौघांना अटक केली. जयवंत सर्जेराव साळवे (वय २९, रा. कोपर्डे हवेली) किरण गुलाब गावित (२३, रा. सैदापूर) अमोल संपत मदने (२५, रा. बनवडी) व मंदार कृष्णदेव कदम (२५, रा. करवडी) अशी त्यांची नावे आहेत. जयवंत व किरण यांनी सलीमवर प्रत्यक्ष गोळीबार केला आहे. संशयित सैदापुरातील गजानन हौसिंग सोसायटीच्या गणपती मंदिराजवळ आल्याची माहिती मिळताच पहाटे त्यांना अटक झाली.
आज या चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावर त्यांना दिनांक १७ सप्टेंबपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले. येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात गुंड सल्या चेप्या गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बेछूट गोळीबार प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी भानुदास धोत्रे व अनिल चौगुले यांना पाच दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी करताना, पोलिसांना वरील संशयितांची नावे मिळाली.

First Published on September 12, 2013 12:17 pm

Web Title: police custody to 4 in salya chepe firing case