कोकण परिक्षेत्र महानिरीक्षक प्रशांत बुरुडे यांची माहिती

संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकणात पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यामुळे चोऱ्या, दरोडे आणि घरफोडय़ांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरुडे यांनी दिली. ते अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गेल्या वर्षभरापासून कोकणातील गुन्ह्य़ांचा तपास आणि त्यांचे न्यायालयात शाबितीकरण या दोन घटकांवर जोर देण्यात आला होता. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. गुन्हाच्या तपासाचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर न्यायालयात गुन्हे शाबितीकरणाचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आगामी काळात हे प्रमाण अधिक कसे वाढेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यापुढील टप्प्यात संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकणातील पाचही जिल्ह्य़ांत विशेष मोहीम राबविण्यात येत असून गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात कोकणात १० जणांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. यात रायगड जिल्ह्य़ातील तीन जणांचा समावेश होता. या वर्षीदेखील जिल्ह्य़ातील तीन जणांविरोधात पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई प्रस्तावित केली आहे. यामुळे चोऱ्या, दरोडे आणि घरफोडी यांसारख्या गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

कोकणातील सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी व्यापक प्रमाणात उपाययोजना करण्यात येत असून केळवा, उत्तन, पुरणगड आणि पावस येथे नवीन पोलीस स्टेशन इमारतींची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्य़ातील दादर येथे गस्ती नौका दुरुस्ती केंद्र (यार्ड) आणि पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी ३८ एकरांचा भूखंड उपलब्ध झाला असल्याचे प्रशांत बुरुडे यांनी सांगितले. ही जागा सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्याने पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. सागरी गस्ती नौकांच्या दुरुस्तीसाठी गोवा शिपयार्ड कंपनीला एजन्सी म्हणून नेमले असून यापुढे बोटी नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मुंबई-गोवा महामार्गावर होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि दुरवस्था या प्रश्नांबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि तीनही जिल्ह्य़ांचे पोलीस अधिकारी यांची संयुक्त बठक २६ जुलला आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.