बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांनी जातीच्या प्रश्नांवर प्रथम भूमिका घ्यावी, असे खुले आव्हान भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
अस्पृश्यता निवारण करण्याचे संकेत गेल्या काही दिवसांपूर्वी या संघटनांनी दिले होते. त्यांनी आधी जातीच्या प्रश्नांवर भूमिका घ्यावी. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन होईपर्यंत या संघटनांनी कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती. जातीच्या प्रश्नांवर मौन न बाळगता आधी त्यांनी भूमिका मांडावी. जात आणि आरक्षण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. जात म्हणजे आपली ओळख बनली आहे. ती पुसून आपली भारतीय अशी ओळख बनायला हवी, असे सांगून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांचा निषेध केला.  
देशातील बॉम्बस्फोटांमुळे हिंदू समाज व पोलीसही बोलायला लागले. हिंदू संघटनांमुळे आपण सुरक्षित आहोत, असेही त्यांना वाटायला लागल्याने नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मारेकऱ्यांचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. हिंसक कट्टरवादी संघटनांना त्यांचे वर्चस्व सिद्ध करायचे असल्याने विचारवंतांना संपल्यानंतर ते लोकशाहीमार्गे जाणाऱ्या धार्मिक संघटनांवर हल्ला करण्यासही कचरणार नाहीत. देशात सध्याची परिस्थिती अराजकतेची सुचक असल्याचे ते म्हणाले.
 अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या जमिनींच्या संदर्भात जो काही लाँगमार्च काढणार आहेत, त्यास भारिप-बहुजन महासंघाचा पाठिंबा राहील.

‘विचारांवर हल्ला’
गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला आणि निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘विचारांवर हल्ला’ असल्याचे सूचक विधान स्वागतार्ह असून त्यांनी आठवडाभराच्या आत लोकशाही मार्गाने जाणाऱ्या धार्मिक संघटना आणि कट्टरवादी हिंसक संघटनांची यादी प्रकाशित करून कोणत्या भूमिकांशी लोकांनी चिटकून राहायचे, हे लोकांनाच ठरवू द्या, असे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
Prakash Ambedkar on RSS PM Narendra Modi Mohan Bhagwat
‘RSS ने आम्हाला साथ द्यावी’, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन; म्हणाले, “मोदी संघाच्या मानगुटीवर…”
akola, Prakash Ambedkar, Allegations, Secret Relationship, Nana Patole, BJP Leaders, congress, lok sabha 2024, elections, maharashtra politics, marathi news,
‘नाना पटोलेंचा भाजपमधील नेत्यांसोबत छुपा संबंध,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “त्यांना भाजपविरोधात…”
PRAKASH AMBEDKAR
मविआला धक्का; प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संधान बांधत उमेदवारांची घोषणा