नाशिकचे माजी पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान परिवहन आयुक्त शाम वर्ध  निवृत्त झाल्यानंतर प्रवीण गेडाम यांच्याकडे परिवहन आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्तपदानंतर शासनाने मुदतीपूर्वीच त्यांची मुंबईतील साहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी बदली केली होती. तेंव्हापासून आतापर्यंत गेडाम मुंबईतील साहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी कार्यरत होते.

नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. धडक अतिक्रमण मोहीम राबवत नगरसेवकांनाही दणका देणारे, उत्पन्नवाढीसाठी अकस्मात सर्वेक्षण मोहीम राबविणारे आणि महापालिकेच्या कारभारात शिस्त आणणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आली होती. डॉ. गेडाम हे मुख्यमंत्र्यांच्या खास विश्वासू गटातील मानले जातात. सिंहस्थ कुंभमेळ्याआधी विकासकामे पूर्ण करण्यासाठी डॉ. गेडाम यांची नोव्हेंबर २०१४ मध्ये नाशिक महापालिका आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या कामांचा धडाका सिंहस्थ काळात पाहावयास मिळाला. विविध अडचणींवर मात करत त्यांनी विहित मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्याची धडपड केली होती. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनही त्यांना प्रशस्तीपत्रक दिले गेले. नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या शैलीमुळे सत्ताधारी मनसेसह विरोधी भाजपसह इतरांनाही ते नकोसे झाले होते.

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?
dhananjay mahadik statment about shoumika mahadik contesting poll from hatkanangale constituency
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक