20 September 2017

News Flash

अवघ्या तासाभरासाठी तुरुंगातून छगन भुजबळांची सुटका

विधानसभेत छगन भुजबळांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वागत

मुंबई | Updated: July 17, 2017 3:35 PM

भुजबळांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तुरूंगाबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे ऑर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनाही पोलीस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आणण्यात आलं, त्यानंतर मतदानासाठी त्यांना विधानसभेत नेण्यात आलं. छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोन्ही नेत्यांचं स्वागत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. राष्ट्रवादीचे इतर नेतेही यावेळी हजर होते.

मुंबईतही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची लगबग बघायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला, भाजपचे गिरीश महाजन, पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांनीही मतदान केलं. तर शिवसेनेचे सुनील प्रभू, नीलम गोऱ्हे यांचीही विधानसभेत मतदानासाठी हजेरी होती.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही पीएमएलए कोर्टाकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली होती. कोर्टानं ही विनंती मान्य करत या दोघांनाही परवानगी दिली होती. आता मतदानाचा हक्क बजावून झाल्यानंतर या दोघांनाही पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याआधीही कोपर्डी प्रश्न आणि मराठा मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं होतं. तसंच वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलावीत असाही सल्ला दिला होता. आता आज त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी मतदान करून आपला हक्क बजावला आहे. त्यानंतर त्यांना आणि रमेश कदम यांना तुरुंगाकडे नेण्यात आलं आहे

First Published on July 17, 2017 3:31 pm

Web Title: presidential poll chagan bhujbal out of jail for hour
 1. K
  Kokan
  Jul 20, 2017 at 5:37 pm
  भ्रष्टवादीच्या म्होरक्यांना कधी आत टाकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. आव्हाड, पुतण्या आणि तटकरे हे ज्या दिवशी आत जातील तो दिवस महाराष्ट्र साठी आनंदाचा.
  Reply
  1. S
   Sandy
   Jul 19, 2017 at 11:18 am
   कोण होतास तू .... काय झालास तू... पैशाचा अति मोह नडला या साहेबांना
   Reply
   1. A
    Anand Shewale
    Jul 18, 2017 at 7:27 pm
    गेले का परत तुरुंगात, हे महत्वाचे. आणि ते स्वतः पवार कधी आत जाणार ? अजित-पुंड, जयंत पाटील, मवाली आव्हाड आणि भुरटे ह्यांचे काय ?
    Reply
    1. R
     Ravi
     Jul 18, 2017 at 2:06 pm
     भुजबळ साहेबाना आता आता महात्मा लुक यायला लागला आहे. साहेब तुरुंगात असताना राष्ट्रवादीने महात्मा उपाधी द्यायचा कार्यक्रम उरकला पाहिजे म्हणजे त्या न्यायाधीशाचे हृदय निदान पाघळेल. खरे तर पन्नाशी नंतर शरीराची जी दगदग होते, त्यामुळे भ्रष्टाचार, बलात्कार हे सारे अपराध माफ केले पाहिजेत. साहेबाना कँसर ची भीती दिसते पण साहेबानी एड्सला कमी लेखू नये ही विनंती.
     Reply
     1. U
      Ulhas Patil
      Jul 17, 2017 at 6:26 pm
      भुबाळाचा गुन्हा अजूनपर्यंत कोर्टात सिद्ध झ्हाला नसेल परुंतु अशी हे एकाच व्यक्ती नाही के जी तुरुंगात आहे पण गुहना शुद्ध झालेला नाही. मग काय त्या बाकीचा कैदयांना पण तुरंगातून बाहेर सोडले होते ? मग हि स्पेसिअल ट्रीटमेंट कश्यासाठी ? कारण ते चोरे नेहरू कंदनाच्य पार्टीतले आहेत म्हणून ? हे लोकशाही न्हवे!
      Reply
      1. V
       Viren Narkar
       Jul 17, 2017 at 4:58 pm
       जितेंद्र आव्हाडने बहुतेक पैसे कुठे लपविले आहेत हा प्रश्न कानात विचारला असणार स्वागत करता करता.
       Reply
       1. C
        Chandramohan
        Jul 17, 2017 at 4:29 pm
        चोरांचे स्वागत गुंडाने केले !
        Reply
        1. N
         Neelam Sanglikar
         Jul 17, 2017 at 4:18 pm
         देशातील लोकशाहीने कारागृहात असलेल्या दोन मतदारांची पण किती महत्त्व असते ते सामान्यांना दाखवून दिले. ज्या कायदेपंडिताने यांना मतदानाचे हक्क बजावयास सांगितले ते दस्तुरखुद्द किती हुशार असणार. देशात इतके विद्वान असताना निकाल पटापट का लागत नाही ? संपूर्ण सिस्टिम किती सडली आहे. दोघे मतदान करू शकले परंतु एक तास सरकारी यंत्रणा त्यांच्यासाठी राबली. होऊ द्या खर्च करदात्यांच्या कष्टाच्या पैश्यातून. यांचा निकाल लवकर लावा आणि त्यांच्याकडूनच पैसे वसूल होऊन सज्जन/प्रामाणिकांना न्याय द्या. अन्यथा देशात वा परदेशात हाच संदेश जाईल की वरपासून खालपर्यंत "मत आणि मतदार विकला जातो". राजकारणात नितीमूल्यना अजिबात स्थान नाही म्हणून असे घडते. परंतु लोकशाहीचे तिसरे स्तंभ "न्यायालय" आहे ना !
         Reply
         1. J
          JITENDRA
          Jul 17, 2017 at 4:17 pm
          लालू, मुलायम, मायावती, सुरेश कलमाडी सुब्रोतो रॉय यांना असेच आत ठेवा व देशाला वाचवा
          Reply
          1. A
           Arun
           Jul 17, 2017 at 3:50 pm
           पक्षातील इतरांनी स्वागत करून काय फायदा. भुजबळांना बळीचा बकरा बनवून स्वतः मात्र "घंटा राजा" आपली चिल्ली पिल्ली वाचवून बसला आहे.
           Reply
           1. M
            Madan Damale
            Jul 17, 2017 at 3:36 pm
            TURUGATUN SUTKA नाही लोकशाहीचा हक्क बजावणे महत्वाचे कारण ते आजून गुन्हा शाबीत झालेले व्यक्ती नाहीत,
            Reply
            1. Load More Comments