‘कोमसाप’चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील साहित्यिकांना विविध वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार देण्यात येतात. ‘कोमसाप’चे हे वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईत होणाऱ्या ‘कोमसाप’च्या तीन दिवसांच्या साहित्य संमेलनात २२ नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पाच हजार रुपये व तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
वाङ्मय प्रकार, पुरस्काराचे नाव, पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि कंसात साहित्यकृती- अनुक्रमे खालीलप्रमाणे
’कादंबरी- र. वा. दिघे स्मृती पुरस्कार-अशोक समेळ (मी अश्वत्थामा चिरंजीव), वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार-प्रा. चंद्रकांत मढवी (उधळ्या)
’कथासंग्रह – वि.सी. गुर्जर स्मृती पुरस्कार-स्टिफन परेरा (पोपटी स्वप्न), विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार मनिष पाटील (माह्यावाल्या गोष्टी)
’कविता- आरती प्रभू स्मृती पुरस्कार-शशिकांत तिरोडकर (शशिबींब), वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार-रेखा कोरे (वास्तवाच्या उंबरठय़ावर)
’समीक्षा ग्रंथ- प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार-कोणाचीही निवड नाही. धनंजय कीर स्मृती विशेष पुरस्कार-मोहन गोरे (आनंदयात्रा), श्रीकांत शेटय़े स्मृती विशेष पुरस्कार-डॉ. भगवान कुलकर्णी (ऑनरेबली अ‍ॅक्वीटेट)
’ललित गद्य -अनंत काणेकर स्मृती पुरस्कार-नीला सत्यनारायण (टाकीचे घाव), लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार-रेखा नार्वेकर (आनंदतरंग)
’बालवाङ्मय- प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार-डॉ. विद्याधर करंदीकर (नाथ पै-असाही एक लोकनेता)