ढोल वादनाद्वारे नळ जोडण्या खंडित करण्याचा इशारा

वारंवार सूचना देऊन व कर्मचारी घरापर्यंत जावूनही घरपट्टी व पाणीपट्टीची थकीत रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध देवळा नगरपंचायतीने अखेर संबंधितांच्या नावांची यादी प्रमुख चौकात फलकांद्वारे जाहीर केली आहे. थकबाकीचा भरणा ३० मार्चपर्यंत न केल्यास थकीत रकमेवर दंड व व्याज आकारण्यात येईल, असा इशाराही नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Daighar Garbage, Daighar, Thane,
ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

देवळा नगर पंचायतीची सुमारे २९ लाख रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी थकलेली आहे. आतापर्यंत त्यातील सुमारे तीन लाखांची वसुली झाली असून सोमवारपासून थकबाकीदारांच्या घरासमोर ढोलताशा वाजवत नळजोडण्या खंडित करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. देवळा ग्रामपालिकेचे नगर पंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथमच थकबाकीदारांकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत थकबाकीदारांच्या नावाचे फलक चौकांमध्ये लावण्यात आले. यामुळे ग्रामपालिका अस्तित्वात असताना थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना आता घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा संदेश फलकाद्वारे दिला गेला आहे.

शहरातील पाच कंदील व मुंजोबा पार चौकात थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवरील नावे वाचण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. काहींनी थकबाकी भरल्यानंतर फलकावरील त्यांच्या नावावर काळ्या रंगाचा पट्टा मारून ती पुसण्यात आली. शहरात लावलेले हे फलक सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत.