कोणतीही तक्रार नसताना कारवाईची धमकी देऊन ७० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक संजय पिसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
 शहरातल्या विमानतळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सहायक पोलीस निरीक्षक संजय पिसे याने गांधीनगर परिसरात राहणाऱ्या एका इसमाला सुमारे दहा दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात बोलावले. तुझ्याविरुद्ध तक्रार आहे. तुझ्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी देान लाख रुपये दे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधिताने माझ्याविरुद्ध कोणती तक्रार आहे, अशी विचारणा केली. पण तुला तक्रार दाखवण्याची गरज नाही. तू मला विचारणारा कोण, असे म्हणत पिसे यांनी त्याला पिटाळून लावले.
 २ ऑक्टोबर रोजी पिसे याने संबंधित इसमाची मोटार पशासाठी पोलीस ठाण्यात आणून लावली. पसे आणून दे आणि मोटार घेऊन जा, असे त्याने स्पष्ट केले.  संबंधिताकडून मोटार जप्त केल्याची नोंदही पोलीस ठाण्यात नव्हती. मोटार सोडवून घेण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. पोलीस ठाण्यात लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक संजय कुलकर्णी, भीमराव िशगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.