प्राणी गणनेत अस्तित्वाच्या खुणांचा अभाव

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेत वाघांचे अस्तित्वच आढळून आले नसल्याने वाघाच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभयारण्यात यंदाच्या पाहणीत बिबटय़ाच्या पाउलखुणा, सांबर, चौिशगा, गेळा यांचे वास्तव्य मात्र दिसून आले आहे. गेल्यावर्षी मात्र या अभयारण्यात वाघ आढळून आले होते.

वनविभागाने वैशाख पौर्णिमेदरम्यान कर्मचाऱ्यांमार्फत प्राणी गणना केली. चांदोलीच्या जंगलात १५ ते २२ मे दरम्यान ही गणना करण्यात आली. यासाठी ट्रान्सेक्ट आणि मांसभक्षी प्राण्यांच्या नसíगक खुणा, विष्ठा, झाडावरील ओरखडे या माध्यमातून सलग आठ दिवस ही प्राणी गणना करण्यात आली. पौर्णिमेच्या रात्री मात्र पाणवठय़ावर प्राणी गणना करण्यात आली.

गेल्या वर्षी चांदोली अभयारण्यामध्ये वाघांचे अस्तित्व आढळून आले होते. या वेळी मात्र वाघाचे अस्तित्व निश्चित करण्यासाठी त्याची विष्ठा, अथवा झाडावरील पंजाचे ओरखडे यापकी काहीही आढळून आले नाही. यामुळे चांदोली अभयारण्यातील वाघांचे वास्तव्य पश्चिम घाटातील कोणत्या परिसरात स्थलांतरित झाले हे समजणे वनविभागाला कठीण बनले आहे.

चांदोलीत तीन पध्दतीने प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये ट्रान्सेकट लाईन, पाणवठय़ावरील पाउलखुणा आणि मांस भक्षी प्राण्यांच्या पंजाचे झाडावरील ओरखडे यांचा समावेश आहे. गणनेसाठी सांगली कोल्हापूर जिल्’ाातील झोळंबी, नांदोली, निवळे, मळे, पाथरपुंज, रूंदीव, सिध्देश्वर, चांदोली खुर्द, सोनार्ली, खुंदलापूर, कोळणेख् आंबोळे, तांबवे, ढाकाळे, गोठणे आदी ठिकाणांची निवड करण्यात आली होती.

या वेळी २५ ट्रान्सेक्ट लाईन मचाणावरून निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणात बिबटय़ाची विष्ठा अनेक ठिकाणी आढळून आली. याशिवाय गेळा, सांबर, भेकर, चौिशगा, रानकुत्रे, रानमांजर, शेकरू, गवे आढळून आले असून काहींची छबी वनकर्मचाऱ्यांच्या कॅमेरात बंदिस्त करण्यात यश आले आहे.