मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
अविश्वासाच्या प्रस्तावावर विरोधकांना रस्त्यावरही उत्तर देण्याच्या गृहमंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधान सभेत आज (बुधवार) दुस-या दिवशी गदारोळ झाला. आपण कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे सांगून आर.आर.पाटील यांनी सदनाची माफी मागण्यास नकार दिला. तर गृहमंत्र्यांनी माफी मागितलीच पाहिजे त्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावरून झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.
शिवसेनेने राज्य सरकार विरोधकात मांडलेला अविश्वास प्रस्ताव बारगळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच विधानसभेत मंगळवारी याच मुद्दयावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विरोधकांना, सभागृहातच काय रस्यावरही पाहिजे त्या पद्धतीने उत्तर देण्याचे खुले आव्हान दिले होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी आजही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत पाटील यांच्या माफिची मागणी केली. मात्र, त्यांनी सदनाची माफी मागण्यास नकार दिला.




















राष्ट्रवादी काँग्रेसविषयी आमचे मत कितीही खराब असले तरी त्या भांगेत आबा हे एकमेव तुळस आहेत. त्या तुळशीच्या जोरावर अजित पवार, भुजबळ, आव्हाडे, तटकरे, जयंत पाटीलसारखे राष्ट्रवादीचे भ्रष्टाचारी नेते सहीसलामत आहेत. खोटे बोलून सदनिका ढापणारे बाबासाहेब कुपेकर मरून नरकात गेले. भले आबांना कुठे आणि काय बोलावे समजत नसेल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत बोलत असतील, पण शिवसेनेने आणि मुंडे-गडकरींच्या भाजपने त्यांना माफी मागायला सांगावी एवढी दोन्ही पक्षातील एकाही वर्तमान आमदाराची लायकी नाहीये. हे कृपया त्या उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ भाजप नेत्यांना समजावून सांगा.
या बातमीवर प्रतिक्रिया ? नकोरे बाबा! ते आबा काय्बी करतील की राव! का जीवाला घोर लाऊन घ्यायचा इनाकारण !आबांना एक सांगावा हाय की रस्त्यावर इरोधकांना चोख उत्तराच्या बारीचा कार्यक्रम भैरोबाच्या देवळापुढे रात्रीच्या टायमास ठेवावा. महाराष्ट्रातलं पाणि आटलं .अंधार झाला .चुल पेटवायला गॅस नाय. पुण्या-मुम्बईचे साहित्यिक सरकारच्या खर्चाने संमेलनं कशापायी साजरी करतात?मायबाप सरकारास व दोन्ही भांड्कुदळया काँग्रेशी पार्ट्यांना नम्र इनंती हाय की निवडणुकी पुर्वी मराठी माणसाची जिता हाय की उलथला याबद्द्ल साधी चवकशी तरी करा!