विखे यांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

मुळा प्रवरा वीज संस्थाच नव्हे तर संस्थेच्या संचालकानांही आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याची भूमिका स्वपक्षाबरोबरच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसणाऱ्या आमच्या काही मित्रांनी केली, असा टोला माजी मंत्री अजित पवार यांचे नाव न घेता, त्यांना विराधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी लगावला.

मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेची ४३ वी वार्षकि सभा आज विखे यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात

झाली, त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे होते. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, संस्थेचे उपाध्यक्ष जी. के. पाटील, जि. प. सदस्य सुभाष पाटील, सिध्दार्थ मुरकुटे, पोपट लाटे, नानासाहेब पवार, इंद्रभान थोरात आदी उपस्थित होते.

संस्थेच्या संदर्भात आमच्या सरकारच्या काळात सर्वाधिक अन्याय सहन करावा लागला असे सांगत विखे पुढे म्हणाले की, संस्थेचे अस्तित्वच नष्ट करण्यासाठी न्यायालयीन लढाईकरिता वीज वितरण कंपनीने आतापर्यंत १८ कोटी रुपये खर्च केला. परंतु सभासद आणि कामगारांच्या विश्वासावर सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून संस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न निश्चितच यशस्वी होईल. संस्थेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई केली असून अजूनही काही लढाया संस्थेला कराव्या लागतील, ती करताना संस्थेने कोणत्याही कामगाराला वाऱ्यावर सोडले नाही. कामगारांची सर्व देणी देणारी ‘मुळा प्रवरा’ ही एकमेव संस्था ठरली आहे. आमच्या सरकारकडून न्यायाची अपेक्षा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही, कारण संस्थेला व संचालकांनाही उद्ध्वस्त करण्याचे काम आमच्या मंत्रिमंडळातील काही मित्रांनी केले. संस्था सुरू करण्याचा आपला प्रयत्न कायम असून सध्याच्या सरकारने संस्थेबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचेही विखे यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी संस्थेची सद्यपरिस्थिती विषद केली. संस्थेसाठी न्यायालयीन लढाई सुरू असली तरी वीजनिर्मिती प्रकल्प उभा करण्याचा निर्धार कायम असून या माध्यामातून संस्था सुरू करण्याबरोबरच कार्यक्षेत्रातील १० हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री म्हस्के, कामगार नेते ज्ञानदेव आहेर