इंडियन रेडिओलॉजिकल आणि इमेजिंग असोसिएशनचे (IRIA) अध्यक्ष डॉ. किशोर तावरी यांचे बुधवारी नागपूरमधील राहत्या घरी निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. २००९ मध्ये मोठ्या मताधिक्यांनी डॉ. किशोर तावरी इंडियन रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. तावरी यांनी २०१० मधील सार्क परिषदेमध्ये रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते. १९७८ मध्ये नागपूरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी नागपूरमध्ये रेडिओलॉजिस्टचे शिक्षण घेतले. त्यानंतर १८८४ त्यांनी एमडीचे शिक्षण पूर्ण केले. किशोर तावरी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्षही होते. वैद्यकीय शिक्षणाच्या शोधकार्यसाठी त्यांना २००४ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.