महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग आयोजित यशवंत पंचायत राज अभियानअंतर्गत रायगड जिल्हा परिषद आणि कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. आर.सी.एफ. क्रीडा संकुल, कुरूळ, ता. अलिबाग येथील मदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पध्रेचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरिवद म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. अर्थ व बांधकाम समिती सभापती श्रीमती चित्रा पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, स्पध्रेचे समन्वयक उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.