संततधार पडणाऱ्या पावसाने सोमवारी संपूर्ण कोल्हापूर जिल्हय़ाला झोडपून काढले. आतापर्यंत जिल्हय़ाच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होता. पण आज हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यावरही वरुणराजा प्रसन्न झाला. पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. धरणांच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत चालली असून सर्वच नद्यांचे पात्र विस्तारत चालले आहे.  जिल्हय़ात गेल्या चोवीस तासांत सरासरी २३.६३ मि. मी. इतका पाऊस झाला तर गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८२.०० मि.मी. पावसाची नोंद झाली.   
जिल्हय़ातील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. तालुक्याच्या नावापुढे गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस दर्शविण्यात आला आहे. कंसात १ जून २०१४ पासून झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी दिली आहे.
करवीर ११.८९ (८५.६०), कागल १६.४४ (१२२.६४), पन्हाळा २१.५७ (२०६.७८), शाहूवाडी ३४.०० (३८१.१४), हातकणंगले ८.३७ (६८.५०), शिरोळ ५.४२ (४८.३९), राधानगरी ३०.३३ (२५२.१८), गगनबावडा ८२.०० (१०६७.३०), भुदरगड २३.२० (२९३.०३), गडिहग्लज  ६.१४ ( १०२.६२), आजरा २३.७५ ( २४६.०० ), चंदगड २०.५० ( २७६.२७ ) नोंद झाली आहे.
जिल्हय़ातील धरणांचा पाणीसाठा याप्रमाणे – राधानगरी ८५.५० (२३६.८१), तुळशी २९.६९ (९८.२९), वारणा ३५५.९२ (९७४.१८), दूधगंगा १५९.९१ (७१९.१२), कासारी २६.५९ (७८.५६), कडवी ३५.४८ (७१.२४), कुंभी २८.२२ (७६.८८), पाटगाव ३९.४९ (१०५.२४), चिकोत्रा ९.४१ (४३.११), चित्री ९.५९ (५३.३९), जंगमहट्टी ८.९९ (३४.६५), घटप्रभा ४३.६५ (४३.६५), जांबरे ३.३२ ( २३.२३ ), कोदे ल. पा. ३.९५ (६.०६).
आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २० फूट, सुर्वे १९ फूट ६ इंच, रुई ४७ फूट ९ इंच, तेरवाड ४२ फूट 6 इंच, शिरोळ ३१ फूट ६ इंच, नृसिंहवाडी २५ फूट ६ इंच आहे.