अवघ्या दीड महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करणाऱ्या नाशिककरांना शनिवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी २० मिनिटे जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.