सांगली, मिरजसह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावली. कुंडल, तासगाव मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झाला तर वाळवा इस्लामपूर परिसरात आज वळिवाने हजेरी लावल्याने हवेतील उष्मा कमी झाला आहे.
काल रात्रीही मिरज शहर परिसरात विजेच्या गडगडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी रात्री मिरजेच्या मिरासाहेब दग्र्यासमोर असलेल्या नगारखान्यावर वीज कोसळली. यामुळे ऐतिहासिक इमारतीच्या कोपऱ्याला तडा गेला असून, आजूबाजूच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. फ्रीज, दूरदर्शन संच जळाले.
आज दिवसभर ढगांची गर्दी होती. सायंकाळी चार नंतर पावसाळी वातावरण तयार झाले. सांगली, मिरज शहरासह तासगाव, कुंडल, तासगाव, कवठे महांकाळ परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे हवेतील उष्णता कमी झाली.

Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या