दलित ऐक्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सतत संपर्क साधू, असे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एकही कार्यकर्ता निवडून आला नाही. या पाश्र्वभूमीवर ऐक्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
रिपब्लिकन ऐक्यासाठी समिती गठित करण्याचा विचार आहे. या समितीत सर्व पक्ष व गटांना मत मांडण्याचा अधिकार असेल. मतभेद झाले तर बहुमताने निर्णय होईल, अशी कार्यपद्धती स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या सर्व प्रक्रियेत प्रकाश आंबेडकर यांनी येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ऐक्य झाल्यानंतर प्रत्येक नेत्याला त्याच्या मानाप्रमाणे स्थान मिळेल. ऐक्यानंतर कार्यकत्रे फुटले, तर त्याला समाजाने धडा शिकवावा, असेही आठवले म्हणाले.
युती सरकारचे काम चांगले चालले असले तरी त्यात गतिमानता आणायला हवी, असेही ते म्हणाले. दलितांवरील अत्याचार थांबविण्यास प्रत्येक जिल्ह्यात समिती असते. राज्यस्तरावरील या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. समितीची प्रत्येक महिन्यास बठक होणे अपेक्षित असते. ती नवे सरकार आल्यापासून झाली नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. रिपाइं कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मििलद शेळके, पप्पू कागदे आदींची उपस्थिती होती.