मुलाला मारण्याची धमकी देत एका महिलेवर संशयिताने बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील अंचाळे येथे घडली. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंचाळे येथील महिला घराचे दरवाजे बंद करून झोपली असताना ही घटना घडली. रात्री अकराच्या सुमारास घराचा मागील दरवाजा ठोठावण्याचा आवाज झाला. कुटुंबातील कोणी आले असे तिला वाटले. दरवाजा उघडताच प्रवीण ऊर्फ दुर्योधन सीताराम पाटील समोर उभा होता. बळजबरीने घरात शिरून मुलाला मारण्याची धमकी देत त्याने महिलेवर बलात्त्कार केला. समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन तो पसार झाला. पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.