भंडाराजवळील सुयोगनगरातील (जवाहरनगर) एका २७ वर्षीय युवकाने घराजवळील २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून एका तिसऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी मुलीच्या आईने जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. आरोपीस अटक करून त्याला भंडारा येथे ४ दिवस पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
सविस्तर वृत असे की, जवाहरनगरजवळील सुयोगनगरातील कमलेश जनार्दन वालदे या युवकाने घराजवळील ९ वर्षीय व ६ वर्षीय एका मुलीवर १ वर्षांपासून ते ११ ऑगस्टपर्यंत चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केला व तिसऱ्या एका ५ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. आरोपी या मुलींच्या घराजवळच राहत असल्याने मामा मामा म्हणत आरोपीचे त्याच्या घरी येणे-जाणे होते. त्या मुलींना आरोपी आपल्या घरी बोलावून चॉकलेटचे आमिष देत होता. ५ वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्याने मुलीने सर्व प्रकार आईला सांगितल्यावर या प्रकरणाचे बिंग फुटले, त्यामुळे आईने आरोपीसोबत भांडण केले. त्याच भांडणात दुसऱ्या मुलींच्या आई वडिलांनीही माझ्या मुलीसोबतही असे प्रकार आरोपीने केले असल्याचे सांगितले. तेव्हा सर्व सत्य उघडकीस आले. मुलीच्या आईवडिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे आरोपी कमलेश जनार्दन वालदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही अल्पवयीन मुलींची व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून आरोपीस अटक करून भंडारा येथे पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज शनिवारी न्यायालयातून आरोपीचा ४ दिवसाचा पी.सी.आर घेण्यात आला आहे. तपास जवाहरनगरचे ठाणेदार नागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रीती आर्ड व सचिन टिचकुले करीत आहेत.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले