पश्चिम घाटाच्या अर्थातच सह्य़ाद्री घाटात जैवविविधतेची विपुलता पक्षिमित्र अभ्यासकांना आढळून येत आहे. महाराष्ट्र राज्य फुलपाखरू म्हणून ओळखले जाणारे मॉरमॉन दाभीळ गावात आढळून आले. त्यामुळे वाईल्ड कोकणच्या भ्रमंती करणाऱ्या या सदस्यांनी कॅमेराबद्ध केले.
राज्य पक्षिमित्र संमेलन दि. २३ व २४ जानेवारी २०१६ रोजी निसर्ग मित्रमंडळ व वाईल्ड कोकणच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत होत आहे. त्यानिमित्त पडवे माजगाव, तळकट, माजगांव, तिलारी, दाभीळ अशा विविध भागांत पक्षिमित्रासह वाईल्ड कोकणचे सदस्य सकाळीच भेट देत असतात. त्यावेळी निसर्गातील अचंबित करून टाकणाऱ्या जैवविविधतेचे दुर्मीळ दर्शन घडत आहे.
वाईल्ड कोकणचे सदस्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी काल रविवारी दाभीळ या डी. के. टुरिझमच्या मामाच्या गावात पोहचले.
तेथे गावातील लोकांनी ग्रामीण संस्कृतीप्रमाणे प्रेमाने स्वागत केले. आबा गवस, दाजी गवस, भरत गवस यांच्यासह स्थानिकांच्या स्वागताने सारेच भारावून गेले.
दाभीळ गाव पर्यटनाचा आस्वाद देणारे सर्वानाच वाटले. या ठिकाणी पक्षी, जंगली श्वापदे निसर्ग, नदी हे सर्व पर्यटकांना पाहायला मिळते, पण वाईल्ड कोकणच्या सदस्यांना फुलपाखरांनी आनंद दिला. पक्षिमित्रांना फुलपाखरांचा एक वेगळाच आनंद लुटता आला, फुलपाखरांनी छायाचित्रे टिपण्याची संधीही दिली. त्यामुळे अभ्यासक खूश झाले.भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न वर्डविंग, कॉमन पीरोट, कॉमन क्रो, टेल्ड जे, इमिग्रंट कुझर, कॉमन ग्रास यलो, ब्ल्यू वॉरल, चॉकलेट पॅन्सी, फोर रिंग्ड, कॉमन मॉरमॉन, सार्जल्ट, ग्रे पॅन्झीसह महाराष्ट्राचे फुलपाखरू म्हणून राज्य सरकारने दर्जा दिलेले ब्लू मॉरमॉन दाभीळमध्ये कॅमराबद्ध करता आले.
यावेळी पक्ष्यामध्ये कोकागी, वेडा राघू, पानकावळा, ट्रीपाय, पाचू कवडा, पांढऱ्या पोटाचा धीवर, कॉमन किंगकीपर, भारद्वाज यलो, बुलबुल, बॅन्डेड, वे कुक, कोतवाल, ब्लक भ्रोटेड, मुनीया, लोकवर्ड, ब्लॅक हुडेड, ओरीओल, ओरीरंटक, हनी बझार्ड, व्हाईट चीकड, बारबेट असे विविधांगी पक्षी टिपता आले.
यावेळी वाईल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर, उपाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव डॉ. गणेश मर्गज, खजिनदार महेंद्र पट्टेकर, सहसचिव काका भिसे, अमोल काळे, जयदीप पडवळ, अक्षता तेली, अंकिता परब, राधा बर्वे, जान्हवी पास्ते, प्रवीण सातोसकर, जगदीश सावंत, मकरंद नाईक, अश्विनी जोशी, अतुल बोंद्रे, आबा गवस, दीनानाथ देसाई, मोहिनी राणे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीसपाटील भिकाजी घाडी, दाजी घाडी, विष्णू घाडी, संदीप राणे, सहदेव राऊळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा