एका गुन्ह्यात कारवाई करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना सांगोला पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर तुकाराम करचे (वय ५४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. ही कारवाई रात्री पावणे अकराच्या सुमाराला सांगोल्यातील हॉटेल ज्योतिर्लिंगजवळ करण्यात आली.


याबाबत एका व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे. शेतजमिनीच्या भांडणात मुलाने वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जाचा निपटारा करून गुन्हा दाखल न करता फाईल बंद करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करचे यांनी केली होती. तडजोडीने एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार सोमवारी रात्री पैसे देताना सापळा रचून करचे यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती एसीबी पथकाकडून मिळाली. सांगोला पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई
Aslam shah
उमेदवारी अर्जासाठी १० हजारांची चिल्लर; नाणी मोजताना अधिकाऱ्यांना एसीतही फुटला घाम, मोजणी संपल्यानंतर…