गडचिरोली जिल्ह्य़ाच्या चामोर्शी तालुक्यातील येदनुर, मुरमुरी व पवीमुरांडा या गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात सी-६० पथकातील सात पोलीस जवान शहीद झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेली ही घटना महाराष्ट्रातील पोलीस दलावर २०१०नंतर झालेला सर्वात मोठा नक्षली हल्ला आहे. नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय समितीचा प्रमुख प्रा. जी. एल. साईबाबा याच्या अटकेनंतर अवघ्या तीन दिवसांतच हा हल्ला करण्यात आल्याने त्याच्याशी या हल्ल्याचा संबंध जोडण्यात येत आहे.
गडचिरोलीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यात नक्षलवादी दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तीन दिवसांपूर्वी सी-६० पथकातील ७० जवान येथील पवीमुरांडा गावी दाखल झाले होते. या जवानांनी येदनुर, मुरमुरी, पवीमुरांडा व परिसर पायी पिंजून काढला. ही शोधमोहीम संपवून जवान रविवारी परतणार असल्याचे समजल्यानंतर नक्षलवाद्यांनी येदनुर व मुरमुरी या दोन गावांमधील पुलाजवळील रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवले. रविवारी सकाळी जवानांच्या गाडय़ांचा ताफा तेथून जात असताना ताफ्यातील तिसरी गाडी नक्षलवाद्यांनी स्फोटाने उडवून दिली. हा स्फोट इतका भीषण होता की सुमो २०-२५ फूट उंच हवेत उडाली व तिच्या ठिकऱ्या झाल्या. यात सात पोलीस जवान शहीद झाले व दोघे जखमी झाले. बाकीच्या गाडय़ांतील जवानांनी पोलिसांच्या मदतीने जखमी व मृतांना हलवले. दोघा जखमी जवानांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असली तरी त्यांच्या जीविताला धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितले.     

शहीद पोलीस
पोलीस शिपाई तिरुपती आलाम (रा. चिट्टर अंकीसा), सुनील मडावी (रा. चंद्रपूर), दुर्योधन नाकतोडे (रा. वडसा), रोशन डंभारे (रा. चामोर्शी), सुभाष कुमरे, दीपक विधाते (रा. गडचिरोली), टाटा सुमोचालक लक्ष्मण मुंडे (रा. अंतरवेली, जिल्हा परभणी)

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..

 जखमी
हेमंत मोहन बनसोड
व पंकज शंकर सिडाम
    
प्रा. साईबाबाच्या अटकेचा सूड?
नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय समितीचा प्रमुख प्रा. जी. एल. साईबाबा याच्या अटकेनंतर अवघ्या तीन दिवसांत नक्षलवाद्यांनी ही मोठी हिंसक कारवाई केली. त्यामुळे साईबाबाच्या अटकेनंतर नक्षलवादी घातपात घडवून आणण्यासाठी अधिक सक्रिय झाले होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षांत गडचिरोलीत एकही मोठी हिंसक घटना झालेली नव्हती. परंतु रविवारच्या घटनेने गडचिरोली हादरले आहे.