अलिबाग नगर परिषद निवडणूक

अलिबाग नगर परिषदेसाठी येत्या २७ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी शेकाप राष्ट्रवादी आघाडीने गुरुवारी १७ प्रभागातील उमेदवारांची घोषण केली. शेकापकडून ८ नवीन तर ९ जुन्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे या वेळी शेकाप नेते आस्वाद पाटील यांनी जाहीर केले. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत राष्ट्रवादीला स्थान देण्यात आलेले नाही. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावे जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी आणि शेकाप नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला. नगराध्यक्षपद प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, कार्यालयीन चिटणीस परेश देशमुख राष्ट्रवादीचे मनोज धुमाळ, जनार्दन पाटील, ऋषिकांत भगत, दत्ता ढवळे, शहर अध्यक्ष संतोष ठाकूर उपस्थित होते. प्रभाग १ मधून सुषमा नित्यानंद पाटील, राकेश वामन चौलकर, प्रभाग २ मधून वृषाली राजन ठोसर, अजय श्रीराम झुंझारराव, प्रभाग ३ मधून गौतम प्रमोद पाटील, अश्विनी अशोक पाटील, प्रभाग ४ मधून प्रदीप कृष्णाजी नाईक, प्रिया नारायण घरत, प्रभाग ५ मधून विनोद दिनकर सुर्वे, संजना संदीप कीर, प्रभाग ६ मधून मानसी संतोष म्हात्रे, उमेश सखाराम पवार, प्रभाग ७ मधून सुरक्षा जगदीश शाह, अनिल रमेश चोपडा, आणि प्रभाग ८ मधून शैला शेषनाथ भगत, राजश्री पांडुरंग पेरेकर, नईमा अफजल सय्यद यांना उमेदवारी देण्यात शेकाप- राष्ट्रवादी आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात येत असल्याचे यावेळी आस्वाद पाटील यांनी जाहीर केले.

अलिबाग नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपद भुषविणाऱ्या नीलम हजारे आणि विषय समित्यांच्या सभापती पदाचे काम पाहिलेल्या संजय सारंग, संदीप शिवलकर, महेश शिंदे यांना या वेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही. तर राष्ट्रवादीकडून शहर अध्यक्ष संतोष ठाकूर हे उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र शेकापकडून राष्ट्रवादीसाठी एकही जागा सोडण्यात आली नाही. जिल्हा स्तरावर राष्ट्रवादीशी आघाडी असल्याने रोहा, श्रीवर्धन, मुरुड आणि महाड येथे याची भरपाई केली जाईल असेही आस्वाद पाटील यांनी स्पष्ट केले.