अलिबागेत शिवछत्रपती महाराजांची ३८९ वी जयंती शनिवारी तिथीनुसार मोठय़ा उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली. शहरातील जोगळेकर नाका येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, प्रदीप नाईक आदी उपस्थित होते. शिवसेनेचे अलिबाग शहरप्रमुख कमलेश खरवले आणि महिला आघाडीच्या तालुका प्रमुख दर्शना पाटील यांनीही शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण केली. यावेळी शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख हेमंत पाटील व इतर शिवसनिक उपस्थित होते. तालुक्यात झिराड, आगरसुरे, आवास, अलिबागेतील मारुती नाका, महेश टॉकीज परिसर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी शनिवारी शिवसनिकांनी शिवजयंती साजरी केली. शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडे सर्वत्र ऐकू येत होते. तालुक्यातील हेमनगर येथे राष्ट्रवादीचे नेते राजा केणी यांनी शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
mahavir jayanti celebration marathi news
सांगली: भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात