समाजाभिमुख आणि सकारात्मक आंदोलनापासून शिवसेना कधीही दूर जाणार नाही, अशी ग्वाही देत शेतकरीहितासाठी शिवसेनेचे उपक्रम सातत्याने सुरू राहतील. शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे, हेच शिवसेनेचे पूर्वीपासूनचे ध्येय आहे, असे प्रतिपादन कापूस िदडीचे प्रणेते परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. दारव्हा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, संतोष ढवळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
रावते म्हणाले की, पावसाअभावी राज्यातील शेतकरी भीषण संकटातून जात आहे. अनेक ठिकाणी पेरण्या उलटल्या. पिके करपली. अशा स्थितीत आपल्या पाठीमागे कोणाची तरी भक्कम साथ शेतकऱ्यांना हवी आहे आणि पेरते व्हा, या अांदोलनाच्या माध्यमातून शिवसेना त्यांच्यासोबत आहे, हेच सांगायला आज येथे आलो आहे. पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेला अनुसरूनच राज्यातील शिवसनिक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्या करू नका एवढीच कळकळीची विनंती मी शेतकऱ्यांना करतो, अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना घातली. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्य़ात १ जुलपासून शिवसेनेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याचा उपक्रम सुरू असल्याचे सांगितले. आतापर्यंत जिल्ह्य़ातील ६० वर शेतकऱ्यांना शिवसनिकांनी पेरणी करून दिली आहे.
शिवसेना सत्तेत नव्हती तेव्हाही आणि आता सत्तेत असतांनाही कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मात्र, संकटकाळात त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडून कुटुंबाला उघडय़ावर पाडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यातील ६५० शेतकऱ्यांना सोयीबीन, तूर बियाण्यांचे व एसएसपी खताचे वाटप करण्यात आले. यावेळी दिवाकर व संजय राठोड यांच्या हस्ते लक्ष्मी धुरट, माया चव्हाण, कमला राठोड, अनंत राऊत, कमला भोकरे, सतवा चव्हाण, शांता शेरे आदी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले.
कार्यक्रमात तूर, सोयाबीन व खताच्या प्रत्येकी ६५० बॅगचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, प्रवीण िशदे, अरिवद गादेवार, उमाकांत पापीनवार, राजेंद्र साकला, तालुका प्रमुख मनोज सिंगी, राजकुमार वानखेडे, गजानन भोकरे, शहर प्रमुख सुधीर दातार, संजय चोपडे, रवींद्र भारती, मनोज ढगले, पंडीत राठोड, महिला आघाडी प्रमुख लता चंदेल, जि.प. सदस्य संगीता इंगोले, पं.स. सदस्य माणिक मेश्राम, महिला आघाडीच्या जयश्री मिरासे, साधना वाणी, आशा डोंगरे , विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख राजू दुधे, गजेंद्र चव्हाण, धनंजय सारखे, रवी तरटे आदी शिवसेना पदाधिकारी, शेकडो शिवसनिक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय गाडगे यांनी केले.