सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. महिला व पुरुष पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते. उंट, घोडे, सजीव आरास, चित्तथरारक कसरतींनी जळगावकर भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम पासून सकाळी ९ वाजता शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौकमार्गे शिवतिर्थ मैदानापर्यंत रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
माजी मंत्री सुरेश जैन, उत्सव समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभा यात्रेबरोबरच स्टेडियम ते जैन व्हॅलीपर्यंत धावण्याची स्पर्धा स्टेडीयम ते जैन व्हॅलीपर्यंत घेण्यात आली. शालेय व खुला अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. यात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला.  काव्यरत्नावली चौकापासून स्टेडीयमपर्यंत सकाळी ८ वाजता महिलांची स्कुटर रॅली काढण्यात आली. नविन बसस्थानक, स्टेडीयम, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम दरम्यान ही रॅली निघाली यात पारंपारिक वेशभूषेत व फेटे परिधान करून महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर