21 September 2017

News Flash

वाडा ग्रामपंचायत निवडणूकीत युतीला बहुमत तर आघाडीचा धुव्वा

वाडा तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल समोर आला असून यात युतीने स्पष्ठ बहुमत

वाडा / वार्ताहर | Updated: November 28, 2012 2:58 AM

वाडा तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल समोर आला असून यात युतीने स्पष्ठ बहुमत मिळवून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा सपशेल धुव्वा उडवला आहे. युतीने १७ जागांपैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे. उर्वरीत जागांवर बहुजन विकास आघाडीचे तीन तर एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला केवळ एक जागा जिंकता आली आहे.
ेसत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. परंतू आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने त्यांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनिष गणारे वाडा शहरात राहत असूनही प्रचारासाठी बाहेर पडले नाहीत. त्यांनी आपल्या प्रभागात मतदानाचा हक्कही बजावला नाही. तसेच राष्ट्रवादीचे नेते योगेश पाटील यांच्या प्रभागातही राष्ट्रवादीला एकही जागा जिंकत आली नाही. विद्यमान सरपंच, उप-सरपंच यांच्या प्रभागातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. वाडा पंचायत समितीचे उपसभापती आणि राष्ट्रवादीचे मंगेश पाटील यांच्या विभागातही श्रीकांत भोईर यांचा विजय झाला. चांबळे येथे मनसेने बाजी मारली.    

First Published on November 28, 2012 2:58 am

Web Title: shivsena bjp wins mejority seats in wada grmapanchayat election
  1. No Comments.