स्वतंत्र विदर्भाचे खंदे पुरस्कर्ते असणारे राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यामुळे फडणवीस सरकार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. अणे यांनी विदर्भाप्रमाणे मराठवाडाही महाराष्ट्रापासून वेगळा केला पाहिजे, असे सांगत ऐन अधिवेशनाच्या काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. जालना येथील एका कार्यक्रमात बोलताना अणे यांनी विदर्भापेक्षा मराठवाड्यावर अधिक अन्याय झाला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याचे आव्हान केले.
शेतकरी आत्महत्येवरून श्रीहरी अणेंचा सरकारलाच घरचा आहेर! 
मराठवाडा व विदर्भात विषमता नसून साम्य आहे. या मराठवाड्यातही वेगळ्या राज्याच्या निर्मितीची मागणी होत असल्यामुळे मराठवाड्याच्या अस्तित्वाचा झेंडा उभारला जात आहे. वेगळ्या राज्याच्या निर्मितीसाठी नेतृत्व निर्माण करणारे घटक महत्त्वाचे असून, संघर्षाचीही तयारी ठेवावी लागते. वेगळ्या विदर्भाची मागणी ४० वर्षांपासून आहे. वेगळ्या राज्याच्या निर्मितीचा निर्णय दिल्लीत घेतला जातो. त्यामुळे दिल्लीवर दबाव आणला पाहिजे, असे त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी अणेंनी वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेसंदर्भात फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला. सध्याचे सरकार वेगळा विदर्भ स्थापन करेल की नाही याबाबत शंकाच आहे, असे त्यांनी म्हटले.
राज्याच्या महाधिवक्त्यानेच सरकारला लाथा मारल्यावर इतर दुश्मनांची गरज काय?- शिवसेना