सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पतसंस्थासमोर निर्माण झालेले आर्थिक प्रश्न तसेच नोटबंदीच्या निर्णयाबाबत मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष पी. एस. डॉन्टस यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी रमेश बोंद्रे, विष्णू पराडकर, सुनिल राऊळ, सुनिल नाईक, अशोक बुगडे, नंदर वेंगुर्लेकर, श्वेता शिरोडकर, शिवराम जोशी, बाळू अंधारी, विल्यम सालढाणा, लीलाधर हडकर, विकास नाईक, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, चंद्रकांत शिरसाट आदी उपस्थित होते.

जिल्ह्य़ातील पतसंस्थासमोर असणाऱ्या अनेक अडचणी सुटाव्यात म्हणून निवेदन देण्यात आली. नव्या नियमामुळे पतसंस्थासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी पतसंस्थाच्या चाव्या भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडे सुपूर्द करण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आल्या.

जिल्ह्य़ात पतसंस्था थकीत कर्जवसुली यंत्रणाच नसल्याने पतसंस्था फेडरेशन निर्माण केले. सहकार कायद्याने पतसंस्था फेडरेशन निर्माण केले.

सहकार कायद्याने २०१ चे अन्वये वसुली दाखले देण्यास अडथळे निर्माण केल्याने पतसंस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. तसेच पतसंस्थासमोर  विषयक आणि आयकर प्रश्नाच्या अडचणीसमोर आहेत. त्या दूर व्हायला पाहिजेत असे म्हटले आहे. सहकार कायद्याने पतसंस्थाच्या आर्थिक प्रगती साधणाऱ्या सुधारणा कराव्यात असेही म्हटले आहे.