पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. ही सर्व मुले सहा ते आठ वर्षे वयोगटातील आहेत, अशी माहिती समजते.

श्रीपाद शाहापूरकर, सौरभ शाहापूरकर, गणेश जुमाळे, धीरज जुमाळे अशी मृत मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले दुपारी साडेचारच्या सुमारास चंद्रभागा नदीवरील चंद्रभागा घाटाजवळील पात्रात पोहोण्यासाठी उतरली होती. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सर्व मुले बुडाली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी चारही मुलांना मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी रुग्णालयासमोर गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान, नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे मुलांचा बळी गेला असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
baramati couple found dead marathi news
बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार
Accident Image
लातूरमध्ये लग्नघरावर शोककळा; लग्नपत्रिका वाटताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू