अरुण टिकेकर यांच्या निधनाने सोलापूरने विद्वान सुपुत्र गमावला आहे. हरिभाई देवकरण प्रशालेसह एकूणच सोलापूरच्या सांस्कृतिक विश्वाशी असलेला जिव्हाळा डॉ. टिकेकर यांनी अखेपर्यंत जोपासला. येत्या २२ व २३ जानेवारी रोजी ते सोलापुरात येणार होते, परंतु त्याअगोदरच त्यांनी अखेरचा निरोप घेतला. डॉ. टिकेकर मूळचे सोलापुरातील  टिकेकरवाडीचे. त्यांचे शालेय शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेत झाले.

प्राचार्य के. पी. मंगळवेढेकर यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. नंतर संगमेश्वर महाविद्यालयात प्राचार्य के. भोगिशयन यांच्यासारखा विद्वान गुरू म्हणून त्यांना लाभला. त्यातून त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता आले.