पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला रोखण्यासाठी नोटाबंदी केली असली तरी या निर्णयामुळे भाजीपाला कमी दराने विक्री होत असल्याने शेतकर्‍यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतकर्‍यांच्या होत असलेल्या नुकसानीला सरकारच जबाबदार असून शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेने रविवारी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे. देवढी फाट्याजवळ रास्ता रोको सुरु करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे सुट्टीच्या दिवशी या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी त्रास सहन करावा लागू शकतो. आंदोलनामुळे वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शकतो. यापूर्वी देखील या संघटनेकडून नोटाबंदीच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात आंदोलने केली आहेत.

[jwplayer uLx2dGsL]

महामार्गावर रास्ता रोको आंदोलनामध्ये बळीराजा संघटना मोफत भाजीपाला वाटप करुन सरकारच्या नोटाबंदीचा निषेध नोंदविताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी देशात अघोषित आणीबाणीने सर्वसामान्य जनता व शेतकरी, शेतमजूर वेठीस धरले जात असून सरकारने यावर तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने केली जात आहे. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत लोकांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. सरकारच्या या निर्णयाचे काही लोक स्वागत करत आहेत. मात्र काही लोकांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करताना दिसत आहेत.

[jwplayer a5j3Q5rm]

सरकारचा हा निर्णय सामान्य जनतेला त्रस्त करणारा असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटताना दिसते. नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधीपक्षाने देखील सरकारव हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले होते.  सरकार गरीब जनतेला त्रस्त करत असल्याचे आरोप विरोधी गोटातून करण्यात आले.  जनतेला त्रास सहन करावा लागत  असल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कार्यक्रमात मान्यही  केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पुण्यामध्ये मेट्रोच्या उद्घाटनप्रसंगी  ५० दिवसानंतर जनतेचा त्रास कमी होऊन  भ्रष्टाचारी लोकांचा त्रास वाढणार असल्याचे वक्तव्य केले होते.  ८ नोव्हेंबरला सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या व्यवहारातून हद्दपार केल्या होत्या. त्यानंतर नोटाबदलण्यासाठी ३० डिसेंबरपर्यत मुदत दिली आहे. कॅशलेस सुविधाला चालना देण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.