सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे नवी दिल्लीत केंद्र सरकारमध्ये वेगाने मार्गी लागत आहेत. यात रेल्वे, विमानतळ, तसेच यंत्रमाग, पाणीपुरवठा, तीर्थक्षेत्रांना जोडणारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण या कामांचा समावेश आहे. भाजपचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी ही माहिती गुरूवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अपवाद वगळता लोकसभेत प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होऊन चर्चा उपस्थित करणारा, प्रसंगी प्रश्न उपस्थित करणारा आपण सोलापुरातील पहिला खासदार असल्याचा दावाही त्यांनी केला.
आपल्या नऊ महिन्यांच्या खासदारकीच्या कार्याचा आढावा सादर करताना अ‍ॅड. बनसोडे यांनी  लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दारूण पराभव करून निवडून आल्याचा आपणास नवी दिल्लीत विशेष लाभ होत नमूद केले. एखाद्या बडय़ा नेत्याचा पराभव करून निवडून आलेल्या नवख्या खासदाराचा दिल्लीत लगेचच प्रभाव पडतो. सचिवस्तरावर झटकन ओळख होते आणि त्यातून आपली कामे मार्गी लागतात. हाच अनुभव आपण   घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, खासदार झाल्यानंतर गेल्या नऊ महिन्यात आपण नवी दिल्लीत केंद्र सरकारशी संबंधित विविध विकासकामांचा पाठपुरावा करीत असून त्यापैकी बरीच कामे मार्गी लागत आहेत. सोलापूर-गुलबर्गा मार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सोलापूरसह अक्कलकोट, गाणगापूर आदी तीर्थक्षेत्रांचा विकास होण्यास मदत होणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकाचाही विकास होणार आहे. सोलापूरकरांच्या सोयीसाठी विविध रेल्वेगाडय़ा सुरू होण्यासाठी आपला यशस्वी पाठपुरावा सुरू असून त्यात लवकरच यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील एनटीपीसी प्रकल्पाच्यावतीने २५० कोटींचा निधी प्राप्त होण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदली प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा निर्वाळा  देताना गुडेवार यांच्या बदलीचा प्रश्न केंद्राचा नसून तर राज्य सरकारशी संबंधित असल्याचे सांगून खासदार अ‍ॅड. बनसोडे यांनी या विषयावर कानावर हात ठेवले.
 

sawantwadi dodamarg wildlife corridor marathi news
मुंबई: सावंतवाडी दोडामार्ग परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करा, उच्च न्यायालयाचे केंद्र व राज्य सरकारला आदेश
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
mumbai south central lok sabha constituency marathi news
आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : प्रदूषण, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावे
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा