मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शासनाचा सामाजिक न्याय विभाग व नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंडची (नॅब) सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८, २९ व ३० डिसेंबर रोजी अंध, अपंग मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पधार्ंमध्ये राज्यातून सुमारे चार हजार अंध व अपंग खेळाडू सहभागी होणार आहेत. पार्क स्टेडिअम व नॉर्थकोट प्रशाला क्रीडांगणावर आयोजिलेल्या या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन दि. १३ रोजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व राज्यमंत्री सचिन अहिर हे उपस्थित राहणार आहेत. नॅबच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडास्पर्धामध्ये अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग चा पाच प्रवर्गातील अपंग मुला-मुलींचा सहभाग राहणार असल्याचे यलगुलवार यांनी नमूद केले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















