सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीस्ठी सायिझग कामगारांनी सुरू केलेल्या संपाबाबत उद्या मुंबई येथे होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत तोडगा काढून संप मिटविण्याच्या प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती आमदार हाळवणकर यांनी दिली.
किमान वेतनाबाबतची याचिका उच्च न्यायालयात असल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेतून पुढील तारीख पडत असल्यामुळे या संपाबाबत उद्याच्या बठकीत चच्रेद्वारेच तोडगा काढणे शहराच्या हितासाठी अनिवार्य आहे. किमान वेतनाची पुनर्रचना १९८४ साली झाली. त्यानंतर ३० वर्षांनी प्रथमच ही दुरुस्ती करण्यात आली असनू हा वाद न्यायालयात असल्यामुळे मार्ग काढण्यात अडचणी उद्भवत आहेत. एक मार्ग काढला तर दुसरी अडचण निर्माण होते, असा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच उद्या मंगळवार १ सप्टेंबर रोजी पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयातील दालनात दुपारी तीन वाजता संयुक्त बठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीला कामगारमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विजय देशमुख, खासदार राजु शेट्टी, अपर मुख्य सचिव वस्त्रोद्योग, प्रधान सचिव कामगार, कामगार आयुक्त, वस्त्रोद्योग संचालक नागपूर, जिल्हाधिकारी कोल्हापूर, जिल्हा पोलिसप्रमुख कोल्हापूर, प्रादेशिक उपसंचालक इस्लामपूर, इचलकरंजी सायिझग असोसिएशनचे अध्यक्ष जयंत मराठे व दोन प्रतिनिधी आणि लाल बावटा सायिझग कामगार संघटनेचे ए. बी. पाटील व दोन प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.