चहा विकून सीए करणारा सोमनाथ गिराम शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका’ योजनेचा ‘ब्रँड अँम्बेसिडर’ झाला खरा पण एका अपघातामुळे आज त्याची परिस्थिती दयनीय झाली असून, सरकारकडून पुरेशी आर्थिक मदत न मिळाल्यामुळे सोमनाथची गेल्या काही महिन्यांपासून परवड सुरू आहे. सरकारने आपल्याला मदत करावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केलीये.

घरची परिस्थिती बिकट असल्याने सोममाथने पुण्यात चहाचे दुकान चालू केले होते. त्यानंतर काम करत शिक्षण पूर्ण करुन जानेवारी २०१७ मध्ये सोमनाथ सी.ए. झाला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकराने त्याला १८ एप्रिल २०१६ ला ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले होते. सोमनाथ त्याचा भाऊ श्रीकांत गिराम व गणेश गिराम यांच्यासोबत अकलूज-टेंभर्णी रस्त्यावरून जात असताना ८ सप्टेंबर रोजी त्यांची गाडी पलटी होऊन त्यांना अपघात झाला. त्यामध्ये गिराम यांच्या मज्जारज्जूवर परिणाम झाल्यामुळे कमरेपासून खालची बाजू निकामी झाली. सोमनाथ सध्या घरी झोपून असतो. त्याच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शेतकरी असलेले त्याचे वडील बळीराम गिराम बघतात. या अपघातानंतर सोमनाथला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, २४ डिसेंबरला दवाखान्यातून सोडल्यानंतर त्याला सरकारकडून ठोसपणे कोणतीही मदत मिळालेली नाही.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
mumbai crime news, 30 year old woman attack mumbai marathi news
लग्नास नकार दिला म्हणून तरूणीवर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

सोमनाथ याने इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. कमवा आणि शिका योजनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सोमनाथ यापुढे काम करेल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यातील कार्यक्रमात म्हटले होते. अपघातानंतर काही दिवस दवाखान्यातील खर्च उचलण्याची जबाबदारी विनोद तावडे यांनी घेतली होती. पण काही दिवसांनी त्यांच्याकडूनही मदत बंद झाल्याचे सोमनाथने म्हटले आहे.
कमरेपासून खालची बाजू पूर्णपणे निकामी झाल्याने मला कसलीही हालचाल करता येत नाही. लहान भाऊ आणि वडिलांचा पूर्ण वेळ माझी देखभाल करण्यात जातो. त्यातच सरकारने दवाखान्याचाच खर्च दिला नाही तर इतर अपेक्षा कशी करु. कमीत कमी सरकारने मला शासकीय नोकरीत घ्यायला हवे, असे सोमनाथने म्हटले आहे.