तटकरे कुटुंबातील गृहकलहाचा फायदा घेऊन बेरजेचे राजकारण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न पुरता फसला  असला तरी भाऊ आणि पुतण्याला झुकते माप देताना सुनील तटकरे यांची कन्या आदिती आणि मुलगा अनिकेत यांचे राजकीय भवितव्याचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रोहा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तटकरे कुटुंबात गृहकलह उफाळून आला होता. याचा फायदा उचलण्याची खेळी शिवसेना नेत्यांनी आखली होती. माजी नगराध्यक्ष समिर शेडगे हे सेनेतून उभे राहण्यास इच्छुक होते. मात्र सेनेकडून सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भविष्यात अवधूत तटकरे आणि अनिल तटकरे या दोन आमदारांना सेनेशी जोडता येईल असा विश्वास शिवसेनेच्या गोटात होता. मात्र नगरपालिका निवडणुकीपूर्वी निर्माण झालेला तटकरे कुटुंबातील वाद निवडणुकीनंतर अचानक मिटल्याचे जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मध्यस्थी कामी आली असल्याचे सांगण्यात आले, तटकरे कुटुंबाचे मनोमीलन झाले आणि शिवसेना नेते तोंडघशी पडले असे चित्र सध्या दिसून येत आहे.

नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
raju shetty marathi news, sadabhau khot marathi news
हातकणंगलेत शेतकरी नेत्यांची भाऊगर्दी

संदीप तटकरे यांच्या पेक्षा समीर शेडगे हे थेट नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार होते. हे निवडणूक निकालानंतर सिद्ध झाले. समीर शेडगे यांचा अपक्ष निवडणूक लढवूनही या निवडणुकीत सहा मतांनी पराभव झाला. तर संदीप तटकरे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे या दोघांमधील मतविभाजनाचा फायदा राष्ट्रवादीच्या संतोष पोटफोडे यांना झाला. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रोह्य़ातून सेनेला चांगली मते मिळवूनही नगरपालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या गृहकलहाचा फायदा होईल अशी अपेक्षा सेनेला होती. पण या मनोमीलनानंतर ती आशाही धुळीस मिळाली आहे. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात सेनेच्या बेरजेच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.

कौटुंबिक वाद की राजकीय खेळी

नगरपालिका निवडणुकीपूर्वी तटकरे यांच्या कुटुंबात निर्माण झालेला गृहकलह जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच मिटला आहे. त्यामुळे हा कौटुंबिक वाद होता की सेनेला रोखण्याची राजकीय खेळी होती असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले होते. लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपले विश्वासू रमेश कदम यांनी शेकापमध्ये पाठवून निवडणूक लढवण्याची खेळी केली होती. शेकापची पांरपरिक मते सेनेला जाऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. अपेक्षेप्रमाणे रमेश कदम यांना सव्वा लाख मते मिळाली. पण मतविभाजनाचा फायदा सुनील तटकरे यांना होऊ शकला नाही. अवघ्या अडीच हजार मतांनी शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले. निवडणुकीनंतर काही दिवसांत रमेश कदम स्वगृही आले. तेव्हा तटकरे यांच्या राजकीय खेळीचा खुलासा झाला. रोहा नगर पालिका निवडणुकीच्या निमित्याने कौटुंबिक वाद दाखवून पुन्हा एकदा तीच राजकीय खेळी तटकरे यांनी खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे.   नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना संदीप तटकरे यांनी सेनेचा एबी फॉर्म न जोडणे, तांत्रिक चूक दाखवून त्यांना अपक्ष उमेदवार ठरवणे हा योगायोग होता की राजकीय खेळीचा भाग यावर आता खलबते सुरू झाली आहेत.

कौटुंबिक महत्त्वाकांक्षेला मुरड घालण्याचे आव्हान

सुनील तटकरे यांना कन्या आदिती हिला राजकारणात पुढे आणायचे आहे. मुलगा अनिकेत निवडणुकीच्या राजकारणात सध्या तरी उतरणार नाही, असे बोलले जाते. पुढील वर्षी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीत भाऊ अनिल यांना पुन्हा उमेदवारी दिली जाते का? आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा अवधूत यांनाच उमेदवारी मिळणार की आदिती हिला उभे करणार? असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न तटकरे कुटुंबीयांमध्ये कायम राहणार आहेत. प्रत्येकीला प्रबळ राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याने मार्ग काढण्याचे आव्हान सोपे नाही. आदिती हिला लोकसभेसाठी उभे केले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कौटुंबिक वाद उफाळून येणार नाही.