मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवरच होण्यासंदर्भात शिवसेनेचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु, असा निर्णय ज्या क्षणी होईल, त्या क्षणी स्मारक उभे राहील. त्यावेळी शिवसैनिक प्रसंगी कायदाही हाती घेतील, असा सूचक इशारा लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी येथे दिला ,नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी आयोजित सर्वपक्षीय सभेकरिता जोशी येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना स्मारकाबाबत त्यांनी मतप्रदर्शन केले. नगररचना कायद्यात अलीकडेच करण्यात आलेल्या बदलामुळे मैदानात बांधकाम करता येणार नाही. कायद्याचे उल्लंघन करून शिवाजी पार्कमध्ये स्मारक बांधता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर जोशी यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला मराठी माणसांकडून विरोध होत असल्याबद्दल संताप व दु:ख होत असल्याचे नमूद केले. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हायला हवे, असे आपले मत आहे. स्मारकाबाबत शिवसेनेचा अधिकृत निर्णय जेव्हा होईल, तेव्हा स्मारक कोणत्याही परिस्थितीत उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




















अगोदर मुंबईतले रस्ते सुधारा…. मग काय ते कायदा हातात वगैरेघेण्याचा गोष्टी करा सर! मुंबईतल्या रस्त्यां बाबत हि कार्य तत्परता का नाही दाखवत सेना???
बाळासाहेब हे आम्हा सर्वांच्या हृदयात स्थित आहेत.. त्यामुळे त्यांच्या स्मारकावरून जे राजकारण होत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे.. मैदान हे खेळण्यासाठीच असते आणि असावे याबद्दल कुणाचेही दुमत असणार नाही.. त्यामुळे हा जो गोंधळ चाललेला आहे तो ताबडतोब थांबवावा अशी आम्हा शिवसेनेबद्दल प्रेम असणाऱ्या सर्व सामान्य लोकांची इच्छा आहे..