गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षणावरून भाजप सरकारने विरोधी भूमिका घेतल्याने मोठय़ा प्रमाणावर उद्रेक झाला. या पाश्र्वभूमीवर मराठा, मुस्लीम आणि धनगर आरक्षणांच्या मुद्दय़ावर उद्रेक होण्यापूर्वी निर्णय घ्या, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारला दिला आहे. मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला होता, पण सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या विरोधी भूमिकेमुळेच आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.