येथील जवाहर नवोदय विद्यालयातील अनेक विद्यार्थिनींचालैंगिक छळ करणाऱ्या तीन शिक्षकांना अटक करण्यात आली. राजन गजभिये, शैलेश रामटेके व संदीप लाडखेडकर अशी या शिक्षकांची नावे आहेत.
शाळेतील ४९ विद्यार्थिनींनी या तिघांविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती.या तिघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने बजावला असून नवोदय विद्यालयाच्या उपायुक्तांनी त्यांना निलंबित केले आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी केली होती.