सोलापुरात प्रथमच पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन पार पडताना उद्घाटकापासून प्रमुख पाहुणे ते थेट स्वागताध्यक्षापर्यंत बहुसंख्य वजनदार मंडळींनी फिरविलेली पाठ, त्यामुळे एकाकी पडण्याची, संमेलनाचा खर्च भागविण्यासाठी स्वतःची मोटार विकण्यापर्यंत प्रमुख संयोजकांवर आफत कोसळल्याचे दिसून आले. ‘घर फिरले की वासेही फिरतात’ या म्हणीचा प्रत्यक्ष कटू अनुभव घेण्याचा प्रसंग संयोजकांवर आला आहे. त्यावरील चर्चा अजूनही सार्वत्रिक स्वरूपात ऐकायला मिळत आहे.

रसिक राजकारणी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेच आपल्या स्वतःच्या सोलापुरात झालेल्या या पहिल्या बालनाट्य संमेलनापासून दूर होते. संमेलनाचे उद्घाटक सुशीलकुमार हेच होते. परंतु त्यांनी पाठ फिरविली. तर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणा-या त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यादेखील संमेलनाकडे फिरकल्या नाहीत. शिंदे यांच्या रूपाने आधारस्तंभच लाभला नाही. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनाचे आर्थिक गणितच बिघडले. इतर अनेक महत्त्वाचे घटक संमेलनात दिसले नाहीत. यात संमेलन समितीचे खजिनदार दत्ता सुरवसे यांच्यापासून ते प्रशांत बडवे यांच्यापर्यंत अनेकांचा नामोल्लेख करावा लागेल. दुसरीकडे संमेलनासाठी २५ लाखांचे अनुदान देण्याचे जाहीर करूनदेखील ऐनवेळी नियमावर हात ठेवत महापालिकेने अनुदानाचा निधी दिला नाही. संमेलनात वावरणा-या महापौर प्रा. सुशीला आबुटे यांना त्याबाबत वारंवार खुलासा करावा लागला. राजकारण्यांचा हातभार लागल्याशिवाय अशी संमेलने यशस्वी होऊ शकत नाहीत. इकडे सोलापूरच्या या पहिल्यावहिल्या अ. भा. बालनाट्य संमेलनाकडे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व भाजपचे आमदार सुभाष देशमुख आदी मोजक्या राजकारण्यांचा अपवाद वगळता एकूणच राजकारणी मंडळींचा बालनाट्य संमेलनावर जणू मूक बहिष्कार होता की काय, अशी थेट शंका उपस्थित केली जात आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्यासह बहुसंख्य राजकारण्यांनी संमेलनात सहभागी न होण्यामागची नेमकी कारणे कोणती, हे सांगायला संमेलनाचे कार्याध्यक्ष विजय साळुंखे हे सांगायला तयार नाही. यात शेवटी आíथक संकटांशी सामना याच साळुंखे यांना करावा लागत आहे. यातूनच संमेलनाचा खर्च भागविण्यासाठी स्वतची मोटार विकावी लागल्याचे सांगितले जाते.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
five different political parties application to mumbai municipal corporation for shivaji park ground
‘शिवाजी पार्क’वर सभांचा धुरळा; मैदानासाठी पाच पक्षांचे महापालिकेकडे अर्ज

बुडत्याला काडीचा आधार
सोलापुरात झालेल्या पहिल्या अ. भा. मराठी बालनाट्य संमेलनासाठी पुरेसे आíथक पाठबळ न मिळाल्यामुळे संयोजकांवर आफत कोसळली खरी; परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत लोकमंगल संस्थेचे अध्वर्यू, आमदार सुभाष देशमुख व सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते यांनी केलेली मदत जणू प्राणवायूच ठरली. आमदार देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेने गेल्याच आठवड्यात सामूहिक विवाह सोहळ्यासाठी उभारलेला भव्य शामियाना बालनाट्य संमेलनासाठी सहज उपलब्ध झाला. त्यामुळे मोठा खर्च वाचला. तर महादेव चाकोते यांनी भोजन व्यवस्थेची जबाबदारी उचलली. शिवाय एक हजार शिक्षकांनी दिलेला आíथक सहयोग म्हणजे बुडत्याला काडीचा आधार वाटावा.