पुण्याहून साताऱयाला निघालेल्या कंटेनरचे ब्रेक खंबाटकी घाटात निकामी झाल्यामुळे तो मागील दोन गाड्यांना धडकून पलटी झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी तात्पुरती बंद करण्यात आली. पुण्याहून साताऱयाकडे जाणारी वाहतूक खंबाटकी घाटाजवळील बोगद्यातून वळविण्यात आली आहे. मात्र, सलग चार दिवसांच्या सुटीनंतर अनेक लोक सातारामार्गे पुण्याकडे येत असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. साताऱयाकडून पुण्याकडे येणारी वाहने खंबाटकी बोगद्याचा वापर करतात. याच बोगद्यातून पुण्याहून साताऱयाकडे जाणारी वाहतूकही वळविण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. घाटात पलटी झालेला कंटेनर बाजूला काढण्यासाठी पोलीसांकडून क्रेन मागविण्यात आली आहे.