रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात कापडे बुद्रुक येथे आज, बुधवारी शाळेच्या पटांगणात झाड कोसळले. शाळेच्या पटांगणात प्रार्थना सुरू असतानाच ही घटना घडली. त्यात २० विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील तीन मुलींना पुढील उपचारासाठी महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कापडे बुद्रुक येथील श्री वरदायिनी विद्यालयाच्या पटांगणात सकाळी १०.२० च्या सुमारास प्रार्थना सुरू होती. त्याचवेळी शाळेजवळील झाड मैदानात कोसळले. या घटनेत २० विद्यार्थीनी जखमी झाल्या. या सर्व विद्यार्थिनी सहावी ते नववी इयत्तेतील आहेत. जखमी मुलींना शाळा व्यवस्थापनाने तातडीने पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. तर तीन मुलींना महाड येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलादपूर रुग्णालयात दाखल केलेल्या मुलींना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक