जिल्ह्य़ात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी रविवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
पारोळा तालुक्यातील हिरसमणी येथील देविदास कौतिक पाटील (३५) या अल्पभूधारक शेतकऱ्यावर विकास सोसायटीचे  ६० हजार तर उसनवारीचे दीड लाख रुपये कर्ज होते. वर्षभरात दोन वेळा गारपीट झाल्याने कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले, तर चाळीसगाव येथे लक्ष्मण चौधरी (५२) यांच्यावर विकास सोसायटीचे ७५ हजार रुपये कर्ज  होते. हवालदिल झाल्याने दोघांनीही आपले जीवन संपविले.