पुण्याच्या वारजे भागात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडे खोरांनी काल(सोमवार) मध्यरात्रीच्या सुमारास एका दांपत्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. कमलाकर रंजेरी(५५) व त्यांच्या पत्नी सीमा(५५) यांची काला रात्रीच्या सुमारास त्यांच्या सदनिकेत हत्या करण्यात आली. हे दांपत्य वारजे पुलाजवळ वास्तव्याला होते. चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी खून केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांमार्फत व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.