जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपतील असलेला बेबनाव आता समोर आला आहे. निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही. व्यक्तिगत पातळीवर भाजपचे दोन उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे घूमजाव भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय िनबाळकर यांनी केले.
बँक निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार राष्ट्रवादीसोबत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. त्यास भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी मूकसंमती दिली होती. या पाश्र्वभूमीवर भाजप जिल्हा कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार बैठकीत िनबाळकर यांनी भाजप कोणासोबतही नसल्याचे जाहीर केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील, संजय पाटील दुधगावकर, शहराध्यक्ष राजाभाऊ बागल, माजी नगरसेवक उदय िनबाळकर यांची या वेळी उपस्थिती होती. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे मात्र हजर नव्हते. जिल्हाध्यक्षांच्या गरहजेरीतच पक्षाची भूमिका वरील मान्यवरांनी जाहीर करून टाकली.
भविष्यात राष्ट्रवादीसोबत कसे गेलात? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होऊ शकतो, याची आम्हाला जाण आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे वाटोळे केले, त्यांच्यासोबत जाण्याचे भाजपने कधीच जाहीर केले नाही. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हावी, या साठी सर्वानीच प्रयत्न केले. त्यात भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष काळे यांना चच्रेसाठी अधिकार दिले होते. ती चर्चा केवळ बिनविरोध निवडणुकीसाठी होती. त्यानंतर घडलेल्या अन्य कोणत्याही प्रक्रियेशी भाजपचा संबंध नसल्याचे िनबाळकर यांनी स्पष्ट केले.
२००४ मध्ये होम ट्रेड घोटाळ्यात जिल्हा बँकेला मोठा फटका सहन करावा लागला. ते नुकसान आजतागायत भरून निघू शकले नाही. नुकसान करणाऱ्या राष्ट्रवादीबरोबर एकत्रित निवडणूक लढविणे म्हणजे बँकेला संकटाच्या गत्रेत पुन्हा लोटण्यासारखे होईल. त्यामुळे आपण राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विरोधात असल्याचे संजय पाटील दुधगावकर यांनी सांगितले.
अॅड. मिलिंद पाटील यांनी राष्ट्रवादीशी भाजपने युती केल्याचे वृत्त निखालास खोटे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपा पूर्वीही होती, आणि पुढेही राहील, असे स्पष्ट केले.
‘चव्हाणांनी काँग्रेस, राजेनिंबाळकरांनी शिवसेना संपविली’
माजी पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी स्वतच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात काँग्रेस अनेकांच्या दावणीला बांधली. त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस संपविली, तर काँग्रेसच्या प्रेमात असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी तालुक्यात शिवसेना संपविली, असा आरोप संजय िनबाळकर यांनी केला. देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांना सोबत घेऊन जिल्हा बँकेसाठी भरीव मदत मिळून बँकेला संकटाच्या खाईतून बाहेर काढले जाईल, असा कांगावा करणाऱ्या राष्ट्रवादीने त्यांची सत्ता होती, त्यावेळी ही मदत का आणली नाही? आमदार राणा पाटील यांचे काका अर्थमंत्री असताना मदत मिळू शकली नाही, ती भाजपच्या राज्यात कशी मिळेल? असा सवालही त्यांनी केला.